मुंबई | प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शन व त्यांनी केलेल्या सहकार्यामुळेच आपण कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लक्षवेधी कामगिरी करू शकलो, असं डॉ. तात्याराव लहाने यांनी म्हटलं आहे.
तात्याराव लहाने यांचा वैद्यकिय क्षेत्रातील कामगिरीसाठी लोकमतकडुन सन्मान करण्यात आला यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा इतका अभ्यास केलेला आहे की ,आम्हा डॉक्टरांपेक्षा त्यांच्याकडे असलेलं कोरोनाचं ज्ञान अधिक आहे, असे तात्याराव लहाने म्हणाले आहेत.काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीसुद्धा उद्धव ठाकरेंच्या कोरोनाविषयीच्या अभ्यासाचं कौतुक केलेलं होतं.
दुसरीकडे राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे यावर बोलताना लहाने यांनी प्रत्येकाने खबरदारी घेणं गरजेचं आहे. हा आजार आणखी वर्षभर आपल्यासोबत राहणार आहे. म्हणून मास्क लावावा लागणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं.यावेळी रोज 2 लाख टेस्ट करू शकू एवढ्या लॅब आज महाराष्ट्रात आहेत. राज्यातील कोरोना मृत्यूदर 38 टक्क्यांवरून आज अडीच टक्क्यांच्याही खाली आला आहे. हे सरकारच्या सहकार्यामुळेच शक्य झालं, असं म्हणत तात्याराव लहाने यांनी राज्य सरकार आणि उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.