HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मराठा आरक्षणावर आज मुख्यमंत्री आणि फडणवीस यांच्यात होणार चर्चा

मुंबई | राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर झाला आहे. यावरून भाजप सतत सत्ताधारी पक्षावर ताशेरे ओढत आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात मराठा आरक्षणप्रश्नी आज (१६ सप्टेंबर) रात्री चर्चा होणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक  बोलवली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीबाबत आणि ही स्थगिती उठवण्याबाबतच्या पर्यायांवर चर्चा होणार आहे. संध्याकाळी साडे सहा वाजता मुंबईतल्या सह्याद्री या सरकारी गेस्ट हाऊसवर ही बैठक होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने तिढा निर्माण झाला आहे. मराठा समाजातील नाराजी वाढत असून अकरावी, पदवी व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे. या पेचातून मार्ग काढण्यासाठी अध्यादेश काढण्यासह वेगवेगळे पर्याय पुढे आले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी आरक्षणाबाबत चर्चा करू असे म्हटले होते.

त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री हे फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. फडणवीस गेले चार-पाच दिवस बिहार दौऱ्यावर असल्याने ठाकरे यांनी त्यांच्याशी फोनवरून देखील बातचीत झाली आहे. त्यामुळे आजच्या या चर्चेत काय होणार, भाजप काय मुद्दे मांडणार याकडे लक्ष लागले आहे.

Related posts

स्वयंघोषित समन्वयकांना मराठा क्रांती ठोक मोर्चा धडा शिकवणार

Gauri Tilekar

राज्यात निवडणुकीदरम्यान ‘या’ घटनांमळे निर्माण झाला तणाव

News Desk

अभिनयातून साकारलेल्या विविधांगी भूमिकांमुळे अभिनेते इरफान खान रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील !

News Desk