मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव करे यांनी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभारण्यात येत असलेल्या कोरोना काळजी केंद्र 2 (CCC 2) व्यवस्थेची आज (१५ मे) पाहणी केली. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, सहआयुक्त (विशेष) आनंद वागराळकर, पी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास क्षीरसागर, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) विजय पाचपांडे, विशेष कार्य अधिकारी देवेंद्र जैन तसेच मिलिंद नार्वेकर हे यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री आणि मान्यवरांनी नेस्को मैदानावर सभागृह क्रमांक २ व ३ या ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेची प्रामुख्याने पाहणी केली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) जयस्वाल यांनी मुख्यमंत्री महोदयांना नेस्को केंद्रावर करण्यात येत असलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली. एकूण १,२४० बेड क्षमता असलेले हे संपूर्ण केंद्र असणार आहे. या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठादेखील उपलब्ध असेल. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि स्नानगृहे, गिझर यासह प्रत्येक बेडला स्वतंत्र पंखा दिले जाणार आहेत. पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका नेमण्यात येणार आहेत. संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या तयारीबाबत समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभारण्यात येत असलेल्या एक हजार खाटांच्या #COVID_19 काळजी केंद्र-२ च्या (CCC-2) व्यवस्थेची केली पाहणी. उद्योगमंत्री @Subhash_Desai उपस्थित. @mybmc चे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यवस्थेची दिली माहिती. pic.twitter.com/cW90oIPkXl
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 15, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.