HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा देश नाही, जो आडवा येइल त्याला पाडून गुढी उभारू!

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२५ ऑक्टोबर) मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच दसरा मेळावा साजरा करत आहेत. आजचा मेळावा हा शिवतीर्थावर नसून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होत आहे. ऑनलाईन दसरा मेळाव्यातून जनतेशी संवाद साधत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या गोष्टी काहीजण करत आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. आम्ही गुळाला चिकटलेले मुंगळे नाहीत. महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा प्रदेश नाही, हे वाघांच राज्य आहे. जो महाराष्ट्राच्या आडवा येईल त्याला आडवा पाडून गुढी उभी करणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. इतकचं नाही तर आज मी मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून बोलतोय, असं देखील ते म्हणाले.

शिवसेनाप्रमुख यांचे हिंदुत्व आणि तुमचे हिंदुत्व यात फरक आहे. नुसत्या थाळ्या आणि टाळ्या पिटुन काही होत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. इथं गाय म्हणजे माता आणि पलीकडे जाऊन खाता, हे कसले हिंदुत्व असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आम्ही तुमच्यासारखे ढेपेला चिकटणारे मुंगळे नाहीत. आणि महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्यांच्या छाताडावर गुढीपाडवा साजरा करेन, असेही विरोधकांना त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वरूण सरदेसाई म्हणजे ‘रडू बाई रडू, कोपऱ्यात बसू’ मनसेची टीका !

Gauri Tilekar

आरोग्यमंत्र्यांनी खोलवर माहिती न घेता RTPCR किट्सवर वक्तव्य केले – अमित देशमुख 

News Desk

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक गुन्हे !

News Desk