HW News Marathi
महाराष्ट्र

कडक लॉकडाऊनची वेळ येणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई | राज्यातील एकूण कोरोनास्थिती तसेच उद्यापासून देशभरात सुरु होणाऱ्या लसीकरणावर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज (३० एप्रिल) फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. उद्या (१ मे ) महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी या संवादला सुरुवात केली. राज्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्वांना मुख्यमंत्री अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की मागच्या वेळीचा महाराष्ट्र दिन लॉ़कडाऊनमध्ये गेला. यावर्षीही तशीच परिस्थिती आहे.

मुख्यमंत्री यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लागू असलेल्या बंधनावर भाष्य केले. मात्र, राज्यात रुग्णसंख्या ओसरली नाही आहे मात्र एक्टिव्ह रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार नाही. आणि लोकांनी हे करुन दाखवलं आहे. जर लोकांनी संयम बाळगता नसता तर परिस्थिती गंभीर झाली असता, असंही मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे :

* उद्या महाराष्ट्राला ६१ वर्षे पूर्ण होत आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवून देणाऱ्या सर्व वीरांना मी अभिवादन करतो.

* मुख्यमंत्र्यांकडून कामगार दिनाच्याही शुभेच्छा. शेतकरी, कामगारांचं स्मरण त्यांना मानाचा मुजरा

* गेल्या वर्षीपासून महाराष्ट्रावर दुष्टचक्र

* सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारले की आताही पेक्षा कडक लॉकडाऊन लावण्याची गरज आहे का?

* माझ्यामते कडक लॉकडाऊन लावण्याची गरज असली तरी माझ्या लोकांवर त्यांच्या संयमावर विश्वास आहे.

* या काळात रुग्णसंख्या घटली नाही पण वाढही झाली नाही. आकडा स्थिरावला.

* आपण संयम दाखवला नसता तर महाराष्ट्राची काय अवस्था झाली असती ह्याची कल्पनाच नको.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राठोड राजीनामा देत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही ! भाजप आक्रमक

News Desk

कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या पुजेसाठी अजित पवार पंढरपुरला जाणार

News Desk

मुंबईत ‘कोरोना’चा संसर्ग थांबविण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी वेगाने कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

swarit