HW News Marathi
Covid-19

“हो मी धावता कोकण दौरा केला पण…”, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

मुंबई | राज्यात सध्या कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात येताना दिसत आहे. त्यामुळे लॉकडाऊन १ जूननंतर उठणार का? काय सरकार निर्णय घेणार या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (३० मे) जनतेशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी बोलताना सुरुवातीला एक महिन्यांनंतर आपण बोलत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी लोकांचे कौतुक आणि आभार मानले कारण दीड वर्ष लोकांनी स्वतःवर जो संयम ठेवला आहे त्याचं कौतुक केलं.

पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने जी हानी केली त्यावर भाष्य केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या दौऱ्यावरून विरोधकांना टोला लगावला. ते म्हणाले की हो मी धावता दौरा केला पण मी सगळ्या गोष्टी नीट पाहिल्या. तसेच मी त्या वादळ आणि एकूण परिस्थितीवर निरीक्षण ठेवून होतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लाईव्हमधील महत्त्वाचे मुद्दे

  • राज्यात दरवर्षी वादळ आणि त्याचं संकट आहे, त्याचा सामना नागरिकांनी आणि प्रशासनाने उत्तम केला
  • किनारपट्टीवर नव्या उपाययोजना करणार
  • राज्य सरकार केंद्राकडे मदत मागणार
  • नुकसान ग्रस्त लोकांना मदत करण्यास सुरुवात
  • केंद्र सरकार वादळग्रस्त लोकांना मदत करणार
  • भूकंपरोधक घरे बांधण्याचा प्रयत्न
  • NDRF च्या नियमांत बदल करणे आवश्यक
  • कोरोना काळातील लोखाजोगा तुमच्यासमोर मांडत आहे
  • कोरोना काळात मोफत धान्य वाटप
  • ५५ लाख शिवभोजन थाळ्या मोफत दिल्या
  • गरिबांचे हाल होऊ नयेत याची खबरदारी
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात एका MPSC उत्तीर्ण तरुणाची आत्महत्या ! नोकरी न मिळाल्याचा होता तणाव

News Desk

“सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नाकामीवर शिक्काच मारला”, सेनेनं केंद्राला डिवचलं

News Desk

महाराष्ट्रासह ५ राज्यांत कोरोना रुग्णांची वाढ, केंद्राने पाठवली आरोग्य पथके

News Desk