HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

महाराष्ट्रात सत्तांतर घडेल,उद्धव ठाकरेचं सरकार जाऊन भाजप सरकार येईल -रामदास आठवले

मुंबई | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएमध्ये सामिल होण्याचं निमंत्रण दिलेल होतं.आता राजस्थानमधील घडामोडींनंतर महाराष्ट्रातही सत्तांतर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सचिन पायलट यांची काँग्रेस  पक्षाने उपमुख्यमंत्रिपदीवरून हकालपट्टी केली त्यावर ते म्हणाले, ‘सचिन पायलट यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयाचे स्वागत, राजस्थान नंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडेल. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस चे राजस्थान प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊनकाँग्रेस सोडण्याचा सचिन पायलट यांनी घेतलेला निर्णय योग्य असून त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत. राजस्थानच्याविकासासाठी सचिन पायलट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीर उभे राहावेअसे म्हणतं त्यांना पायलट यांना भाजपमध्ये या असे निमंत्रण दिले.

राजस्थानबाबत आठवले म्हणतात , राजस्थान मध्ये बहुमतासाठी 101 आमदारांची गरज आहे. सचिन पायलट यांनी त्यांना 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यांनी जर 30 आमदारांचा पाठिंबा मिळविला तर भाजप कडे 78 आमदारांचे संख्याबळअसून सचिन पायलट यांच्या 30 आमदारांमुळे भाजप 108 आमदारांच्या बळावर राजस्थानात भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते. जसेमध्यप्रदेश मध्ये काँग्रेसच्या कमलनाथ चे  सरकार जाऊन भाजपच्या शिवराज सिंह चौहान यांचे  सरकार आले तसेच राजस्थानात काँग्रेसचे सरकार जाऊन भाजप चे सरकार येईल. राजस्थान नंतर महाराष्ट्रात ही सत्तांतर घडेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार जाऊनमहाराष्ट्रात भाजप चे सरकार येऊ शकते अशी शक्यता आहे.सचिन पायलट यांचा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकार मध्येसन्मान होत नव्हता.  अपमान होत असल्याने सचिन पायलट यांनी काँग्रेस च्या सर्व पदांचा राजीनामा देऊन योग्य निर्णय घेतला आहे .

Related posts

अशोक चव्हाणांना ‘त्या’ पदावरून हटवा !, विनायक मेटे आक्रमक

News Desk

कुमारस्वामी ‘अ‍ॅक्सिडेंटल सीएम’, भाजपचा टोला

News Desk

कोकणात जाण्यासाठी बुकिंग कधी सुरू होणार, काय नियम? जाणून घ्या…

News Desk