HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट होणार?

मुंबई | गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. भाजप आणि शिवसेनेची अनेक दशकांपासूनची युती तुटली. सेनेने ही युती तोडत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉग्रेससोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. शिवसेनेने राज्यात सत्ता स्थापन करण्यापूर्वी केंद्र सरकारमधून काढता पाय घेतला. भाजपला विरोधात बसवत या युतीमधील संबंध अधिक ताणत गेले आणि याच पार्श्वभूमीवर उद्या (२१ फेब्रवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवत आहेत. पंतप्रधानांची ही भेट झाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदींची भेट घेतील.

येत्या २४ फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. याच अधिवेशनासंदर्भात ही भेट असू शकते अशीही चर्चा राजकीय वर्तृळात होत आहे. मात्र अद्याप पंतप्रधानांकडून मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ देण्यात आली नाही आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांशी सदिच्छा भेट घेऊन राज्यासाठी आर्थिक मदत मागू शकतात अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘मी पंतप्रधानांना भेटायला जाणार’, असल्याचे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वीच म्हटले होते. ‘मुख्यमंत्री झाल्यावर मी दिल्लीला जाणार आहे. माझ्या मोठ्या भावाची भेट घेणार आहे. कारण पंतप्रधान मोदी मला त्यांचा लहान भाऊ म्हणतात,’ असे उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना संबोधित करताना म्हणाले होते. आता नक्की उद्या उद्धव ठाकरेंची मोदींशी भेट होणार का आणि भेटीमागचे नेमके काय कारण असणार आहे याची उत्कंठा आता सगळ्यांनाच लागलेली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धरणे आंदोलन करणाऱ्या गर्भवती महिलेची आंदोलन स्थळी प्रसूती; प्रशासनाची डोळेझाक

Aprna

अंबाजोगाईत अल्पवयीन अत्याचार प्रकरणी; पोलीस, होमगार्ड व सेवानिवृत्त नायब तहसीलदार ताब्यात!

News Desk

MPSC ची परीक्षा होणार की नाही ? मोठी आणि महत्वाची बातमी

News Desk