HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर

नागपूर | कोरोनाच्या कठीण काळात मुख्यमंत्री घरातच बसून आहेत अशी टीका वारंवार करण्यात आली होती. या टीकेनंतर आता उद्धव ठाकरेंनी दौऱ्यांचा सपाटाच सुरु केला आहे. मुख्यमंत्री आज (८ जानेवारी) पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना ते भेट देतील. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचं नागपुरात आगमन होईल. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने गोसेखुर्द धरणाकडे रवाना होणार आहेत.

गोसेखुर्द प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्षी 2 हजार कोरी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचं पाटंबधारे विभाकडून सांगण्यात आलं होतं. जुलैमध्ये पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला होता. त्यावेळी प्रकल्पाच्या पुनर्वसनाला गती देण्याची सूचना केदार यांनी दिली होती.

गोसेखुर्द धरणाची क्षमता

गोसेखुर्द प्रकल्पाची सुधारीत प्रशासकीय मान्यता १८ हजार ४९४ कोटी रुपयांची आहे. प्रकल्पाची एकूण क्षमता ११४६ दलघमी आहे. तर सिंचन क्षमता २ लाख ५० हजार ८०० हेक्टर आहे. गोसेखुर्द धरणावर खासगीकरणांतर्गत २ विद्यूत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून कोकणातील प्रकल्पांचीही पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० डिसेंबरला सातारा, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याचा दौैरा केला. रत्नागिरी इथं दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोफळी प्रकल्पाची पाहणी केली. पोफळी जलविद्युत प्रकल्पातील विद्युतगृहाचीही पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अनिल परब, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा! भाजपचा सेनेवर वार

News Desk

देशातील जनता-विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, सोनियांची भाजपवर टीका

News Desk

लातुर-बर्दापूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गाची डॉ.प्रीतम मुंडेनी केली पाहणी

Aprna