HW News Marathi
महाराष्ट्र

भंडारा – मुख्यमंत्री ठाकरे यांनी आरोग्यमंत्र्यांना तात्काळ दिले चौकशीचे आदेश

मुंबई | भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. माहिती घेण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता शिशु केअर युनिटमध्ये शनिवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. तर सात बालकांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दखल घेत आरोग्य राजेश टोपे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत१० नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील चर्चा केली असून, त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर मुलाने मुलासारखे वागले पाहिजे !

News Desk

रश्मी शुक्लांना अटकेपासून दिलासा मात्र अनिल देशमुखांवर टांगती तलवार

News Desk

राज्यातील घाणेरड्या राजकारणामुळे मला राजीनामा द्यावा लागला ,संजय राठोडांची खंत!

News Desk