HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ‘वर्षा’वर बोलावली बैठक, लॉकडाऊन की कडक निर्बंध?

मुंबई | राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. पुन्हा लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती सध्या उद्भवली आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी 4.30 वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, देशातीलही एकूणच कोरोची स्थिती गंभीर होत असल्याने आज दिल्लीतही महत्वाची बैठक होणार आहे. तसेच, पुण्यातही आज पुण्याचे पालकमंत्री अजित पवार बैठक घेणार आहेत. पुण्यात लॉकाडऊन लागणार की निर्बंध क़डक होणार यासाठी आजची बैठक आहे. त्यामुळे एकूणच कोोरनाची स्थिती पाहता आजच्या सगळ्या बैठका महत्वाच्या आहेत.

पुणेकरांनी नियमांची कडक अंमलबजावणी करा व रुग्ण संख्या कमी नाही झाली तर २ एप्रिल पासून लॉकडाऊन जाहीर करेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात घेतलेल्या बैठकीत दिला होता. या पार्श्वभूमीवर आज रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात पवार यांच्या अध्यक्षतेखालील होणा-या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीमुळे प्रशासकीय हालाचलींना वेग आला आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त, लोकप्रतिनिधी उपस्थितीत राहणार आहे.या बैठकीत पुण्यात लॉकडाऊन करायचा की निर्बंध अधिक कडक करायचे याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

राज्यात ३२,६४१ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २४,३३,३६८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.२% एवढा झाला आहे. राज्यात २४९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९२% एवढा आहे. सध्या राज्यात १९,०९,४९८ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर १८,४३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,६६,५३३ सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल ८०११ कोरोना रुग्णांची नोंद तर ६५ बाधितांचा मृत्यू झाले आहेत.

मुंबईची स्थिती काय?

दरम्यान, काल (१ एप्रिल) दिवसभरात मुंबईथ ८ हजार ६४६ नवीन कोरोनाबाधित वाढले असून, १८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.याशिवाय मागील २४ तासांत मुंबईत ५ हजार ३१ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. आजपर्यंत ३ लाख ५५ हजार ६९१ जण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीस मुंबईत ५५ हजार ५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ११ हजार ७०४ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारामतीमध्ये १६ जुलैपासून १० दिवस लॉकडाऊन !

News Desk

पुण्यात १७ मेनंतर ३ टक्के कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम | पालिका आयुक्त

News Desk

मुंबई महानगरपालिकेकडून ‘फेसमास्क’ न वापरणा-यांकडून एका दिवसात ३२ लाखांची दंड वसुली रेस्टॉरंट, मंगल कार्यालय, क्लब, जिमखाना इत्यादींमध्येही धडक कारवाई

News Desk