HW News Marathi
महाराष्ट्र

“उद्धव ठाकरेंची महाविकासआघाडीत घुसमट होतेय, आज ना उद्या ते बाहेर पडतील”, संजय काकडेंचं मोठ विधान

पुणे | भाजपचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत एक मोठं विधान केलं आहे. मी उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतो. त्यांची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे. आज ना उद्या ते नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, असं मोठं विधान संजय काकडे यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

संजय काकडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे विधान केलं आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. त्यांना जे काही चाललंय ते आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत, असं संजय काकडे म्हणाले. शिवसेना गेली २५ वर्षे युतीत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मला वाईट वाटते, असंही ते म्हणाले आहेत.

प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

दरम्यान, संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कालच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी आज हे मोठं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काकडे यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिकेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राष्ट्रवादीत आल्यानंतर भाजपमधील गद्दार लोकं कळाली’ – एकनाथ खडसे

News Desk

गोदापात्रातील नियमबाह्य वाळू उपशाविरोधात बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप आमदाराचा एल्गार

News Desk

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

Aprna