HW News Marathi
देश / विदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या घेणार भेट

मुंबई | देशात एकीकडे कोरोनाचं संकट आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात प्रचंड तापला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने राज्य सरकारने मोदींकडे धाव घेतली होती. राज्य सरकारने यात केंद्राने लक्ष घालावे असं सांगितलं होते. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (८ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाप्रश्नी प्रामुख्याने ही भेट असणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे प्रचंड आक्रमक झाले आहेत. गेले काही दिलस ते महाराष्ट्रभर दौरा करत मराठा समाजातील लोकांच्या अडचणी जाणून घेत होते. त्यानंतर काल (६ जून) राजयगडावरुन १६ जूनला कोल्हापूरातून आंदोलनाची हाक त्यांनी दिली आहे. त्याआधीच आता उद्धव ठाकरे मोदींची भेट घेणार असल्याने मराठा आरक्षणावर काय तोडगा निघणार का हे पाहणे अत्यंत महत्वाचे असणार आहे.

मराठा समाजाचं लक्ष ठाकरे-मोदी भेटीकडे

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यामध्ये उद्या मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. या भेटीत केंद्र सरकारने काय केल्यास मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच घटनादुरुस्ती आणि मागासवर्ग आयोगाच्या अनुषंगानेही या भेटीत चर्चा करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मोदी-ठाकरे यांची पहिल्यांदाच भेट होत आहे. या भेटीतून मराठा आरक्षणावर मार्ग निघण्याची दाट शक्यता असल्याने त्याकडे संपूर्ण मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागलं आहे.

जयंत पाटलांचे संकेत

दरम्यान, कालच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नी लवकरच पंतप्रधानांची भेट घेण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. ‘मराठा आरक्षणाला सगळ्या स्तरातून, वेगवेगळ्या संघटनांकडून पाठिंबा मिळालेला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात याबाबत वेगळा निर्णय झाला. परंतु, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून आता संसदेत याबाबत आवाज उठवण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षण लागू करण्यासाठी आग्रह करणार आहे’, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चीनीमधील भूकंपात १०० ठार

News Desk

रिझर्व्ह बँकेचे पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर निर्बंध, बँकेचे सर्व व्यवहारसह बंद

News Desk

#MeToo : मला भीती दाखवून माझ्याशी संबंध प्रस्थापित केले !

Gauri Tilekar