HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला मुख्यमंत्री गेले राजभवनावर!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (१७ जून) सकाळी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा दीड वर्ष संघर्ष आहे. मात्र तरीही महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीचा वारसा जपत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते.

राज्यपालांवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव

रम्यान, मुख्यमंत्री राजभवनावर पोहोचण्यापूर्वी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर सर्वात आधी राजभवानावर पोहोचले होते. मिलिंद नार्वेकर यांनी सकाळी 9.30 ला राजभवनावर जाऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आहेत हे सर्वश्रुत आहेत. मात्र ते शिवसेनेचे संकटमोचक किंवा यशस्वी मध्यस्थ म्हणून काम केल्याचं यापूर्वी अनेकवेळा दिसून आलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपकडून राज्यसभा लढण्याची घोषणा, कोण आहेत उमेदवार संजय उपाध्याय?

News Desk

अनंत गीते म्हणाले, ‘शरद पवार आमचे नेते होऊच शकत नाहीत’, आता संजय राऊत म्हणतात, ‘पवारसाहेब देशाचे नेते!’

News Desk

नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड रेल्वेसाठी वापरले जावे! – आदित्य ठाकरे

Aprna