HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंचे लाडके मिलिंद नार्वेकर यांना मिळाली मोठी जबाबदारी,थेट देशपातळीवर चर्चा !

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लाडके आणि शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांना आता एक मोठी जबाबदारी मिळाली आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केली. या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यपदी नियुक्ती व्हावी यासाठी देशभरातून मोठी चढाओढ असते. मात्र प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून ही नियुक्ती सुचवत असतात.आणि याच पार्श्वभूमिवर देशातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्रातून या यादीमध्ये शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला आणि…

प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील एक नाव या सदस्य यादीमध्ये सुचवणं अपेक्षित आहे.त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्यानंतर महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.त्यामुळे नार्वेकरांना आता मोठी जबाबदारी मिळाली आहे.

 

मिलिंद नार्वेकर आहेत तरी कोण ?

मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत.मुख्यमंत्र्यांचे अत्यंच जवळचे म्हणून ते ओळखले जातात. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली.त्यानंतर आता देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. त्यामुळे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचं वलय आता देश पातळीवर विस्तारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतच्या भावाची संजय राऊतांना नोटीस, सुशांतच्या वडलांबद्दल केलेल्या वक्तव्याची ४८ तासांत माफी मागा अन्यथा…

News Desk

ऐतिहासिक स्मारकांच्या विकासासाठी नियोजन समितीच्या निधीतून तरतूद! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक रुग्ण!

News Desk