HW News Marathi
Covid-19

मुंबईत रोगप्रतिकारशक्ती विषयक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यास केंद्राने सहकार्य करावे – मुख्यमंत्री

मुंबई | कोरोनाच्या या साथीतून आपल्याला खूप शिकायला मिळाले. महाराष्ट्राने अगदी सुरुवातीपासून कोरोनाविरुद्ध प्रखर लढा दिला आहे. या साथींच्या रोगात प्रतिकार शक्तीचे महत्त्व लक्षात घेऊन मुंबईत रोगप्रतिकारशक्तीविषयक अद्ययावत प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यास केंद्राने सहकार्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२७ जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

भारतीय वैद्यक संशोधन परिषद ( ICMR) ने देशातील ३ ठिकाणी उच्च क्षमतेची अद्ययावत चाचणी सुविधा उभारली आहेत. महाराष्ट्रात मुंबई येथे राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान ( NIRRH) तसेच कोलकाता आणि नोएडा अशी ही ३ ठिकाणे आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते या प्रयोगशाळांचे ऑनलाईन उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी प्रत्येक देशवासियाला कोरोनापासून वाचविणे हा आपला संकल्प असून इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाने वेळीच तातडीची पाऊले उचलल्याने कोरोनामुळे होणारे मोठ्या प्रमाणावर मृत्यू रोखल्याचे आणि १० लाख लोक बरे झाल्याचे सांगितले आहे.

कोरोना लढ्यात ही आवश्यक सुविधा उपलब्ध केल्याबद्धल पंतप्रधानांना धन्यवाद देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धन्यवाद देखील दिले. सध्या केवळ चाचणी, रुग्णांचे संपर्क शोधणे, आयसोलेशन अशा काही माध्यमांतूनच आपण लढतो आहोत. कोरोनावर उपचारासाठी निश्चित औषध आज तरी नाही, त्यामुळे सगळे विश्वच एक प्रयोगशाळा बनले आहे. महाराष्ट्र शासनाने मुंबई, पुणे तसेच इतर शहरांमध्ये कोरोना विषयक जम्बो सुविधा उभारण्यास सुरुवात केली असून मुंबईत तर २० दिवसांमध्ये आम्ही या सुविधा उभ्या केल्या आहेत. ‘चेस दि व्हायरस’ परिणामकारकरित्या राबविल्याने चांगले परिणाम दिसत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर ५००० प्रवास भत्ता द्या”, भाजपची मागणी

News Desk

‘महाराष्ट्रात लॉकडाऊन केलं तर सहकार्य करा’,मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फोन !

News Desk

अजित पवार मुख्यमंत्र्यांना जरा सांगा ….निलेश राणेंनी काय मागणी केली ?

News Desk