HW News Marathi
Covid-19

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

मुंबई | राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. उदय सामंत गेल्या दहा दिवसांपासून विलगीकरणात आहेत. उदय सामंत यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे. उदय सामंत यांनी आपली प्रकृती ठीक असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

“गेले दहा दिवस स्वतः विलगिकरणात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेल्या १० दिवसांत कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार”,.असे उदय सामंत यांनी ट्विट करत म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतात आता रशियाच्या स्फुटनिक लसीच्या वापराला परवानगी! 

News Desk

औरंगाबादमध्ये १७ मेपर्यंत दारुची दुकाने बंद राहणार

News Desk

लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना मूळगावी जाण्यासाठी ११ मेपासून मोफत एसटी प्रवास

News Desk