HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या कोअर कमिटीला अमित शाहांचे मार्गदर्शन

मुंबई | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. मात्र, शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून सत्ता संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज (१० नोव्हेंबर) भाजपच्या कोअर कमिटीची दुसरी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थान सुरू आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व्हिडिओ कॉन्फरेन्सिंद्वारे भाजप नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच केंद्रातून भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव ‘वर्षा’वर गेले आहेत.

राज्यापालांनी निमंत्रण दिलेल्यानुसार भाजपला उद्या (११ नोव्हेंबर) सायंकाळी ८ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली. यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची आजच्या दिवसभरात दुसरी बैठक सुरू आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेसंदर्भात अंतिम निर्णय येण्याची शक्यात वर्तवली जात आहे. ही बैठक पार पडल्यानंतर राज्यात सत्ता स्थापन करणार की नाही हे भाजप जाहीर करणार आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे याकडे लक्ष लागेल आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींकडे पाहून जनतेने भाजप खासदारांना निवडलं ! अजित पवार

News Desk

राज ठाकरेंच्या सभेसाठी मैदान मिळत नाही

News Desk

पार्थ पवार ‘या’भाजप नेत्याच्या भेटीला ! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…

News Desk