HW News Marathi
महाराष्ट्र

मी रिलायन्सनचं टेंडर रिजेक्ट केलं अन्…; गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा

मुंबई | “मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे च्या बांधकामासाठी धिरूभाई अंबानी यांच्या रिलायन्सने देखील टेंडर दिले होते. परंतु मी ते टेंडर रिजेक्ट केले होते. माझ्या निर्णयामुळे धिरूभाई अंबानी माझ्यावर नाराज झाले होते. यामुळे माझ्यावर मुख्यमंत्री देखील नाराज तर झालेच होते. पण मी अंबानींचे टेंडर रिजेक्ट केल्यामुळे खुद्द बाळासाहेब ठाकरे देखील माझ्या या निर्णयावर नाराज झाले होते,” असा एक किस्सा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईच्या ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑन इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज इन हायवे’ या परिषदेमध्ये त्यांनी सांगितला. 

याबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी मला विचारल्यावर गडकरींनी सांगितले, “तुम्ही असे का केले. मी त्यांना सांगितले आपण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, वांद्रे-वरळी सी लिंक आणि इतर प्रकल्पांसाठी आपण लोकांकडून पैसे उभे करू. तेव्हा सर्वजण माझ्या बोलण्यावर हसत होते,”  त्यांनी उपस्थितींना सांगितले. “आजच्या परिषदेमुळे मला महाराष्ट्रातील १९९५ सालचा माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील एक किस्सा आठवला. तेव्हा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे च्या बांधकामासाठी धिरूभाई अंबानी यांच्या रिलायन्सने देखील टेंडर दिले होते. परंतु मी ते टेंडर रिजेक्ट केले होते. माझ्या निर्णयामुळे धिरूभाई अंबानी माझ्यावर नाराज झाले होते. पण, मी अंबानींचे टेंडर रिजेक्ट केल्यामुळे खुद्द बाळासाहेब ठाकरे देखील माझ्या या निर्णयावर नाराज झाले होते.”

यावेळी गडकरींनी बोलताना सांगितले, “रिलायन्सने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेसाठी ३६०० कोटींची निविदा सादर केली होती. पण, एमएसआरडीसीच्या माध्यमातून आम्ही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे १६०० कोटींमध्ये पूर्ण केला. या प्रकल्पात २ हजार कोटी रुपये यात वाचवले. राज्य सरकराने प्रकल्प मोनेटाईज करून यातून ३००० हजरा कोटी मिळवले. आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दीज वर्षापूर्वी पुन्हा मोनेटाईज केला यातून ८ हजार कोटी मिळवले.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार – धनंजय मुंडे

News Desk

गृहमंत्री पदाच्या बदलीच्या चर्चेवर कॉंग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

मुंबई वीजपुरवठा खंडित प्रकरण | चौकशीसाठी समिती गठीत, ७ दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश

News Desk