HW News Marathi
Covid-19

सोमवारपासून पुणे होणार अनलॅाक ! काय सुरू काय बंद?

पुणे | महाराष्ट्रात ७ जूनपासून अनलॅाकच्या प्रक्रियेला सुरूवात होते आहे.मुंबई आणि पुण्यात पॅाझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने अनेक गोष्टी सुरू होणार आहेत. पुण्यात सोमवारी म्हणजे ७ जूनपासून काय सुरू काय बंद असणार ?

पुण्यात सोमवारपासून दुकानांची वेळ दुपारी ४ पर्यंत !

पुणे मनपा हद्दीत अत्यावश्यक आणि इतर दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्याचा निर्णय आपण घेतला असून शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने ४ वाजेपर्यंत सुरु राहतील.

पुण्यात हॉटेल ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ पर्यंत सुरु राहणार !

हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवारदरम्यान दु. ४ पर्यंत सुरु ठेवण्यात परवानगी देण्यात येत आहे. दुपारी ४ नंतर आणि शनिवार-रविवारी पार्सल सेवा देता येईल. घरपोच सेवा रात्री ११ पर्यंत सुरु राहील. सोमवारपासून लागू.

पुण्यातील उद्याने-मैदाने पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत सुरु !

सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, खुली मैदाने, चालणे आणि सायकलिंग आदींसाठी पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली असून हा नियम आठवड्यातील सर्व दिवस लागू असेल.

पुण्यामध्ये मॉल-सिनेमागृह बंदच राहणार !

पुणे मनपा हद्दीतील मॉल्स आणि सिनेमागृह तूर्त बंदच ठेवण्यात येत असून सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स असे दोन्ही प्रकारातील सिनेमागृह बंद राहतील.

पुण्यातील खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ पर्यंत सुरु !

पुणे मनपा हद्दीतील सर्व खासगी कार्यालये एकूण क्षमतेच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांसह दुपारी ४ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.

पुण्यात सलून, व्यायाम शाळा सुरु राहणार !

व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, Wellness Centers आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळ घेऊन (Appoinment) दुपारी ४ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी राहील. मात्र सदर ठिकाणी वातानुकूलित (AC) वापरता येणार नाही.

PMPML बस सेवा सोमवारपासून सुरु !

आपल्या शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा असलेली PMPML बससेवा सोमवारपासून ५० टक्के आसन क्षमतेवर सुरु करण्यात येत असून उभा राहून प्रवास करण्यास परवानगी नसेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंता वाढली ! राज्यात आज ४ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

…मग पंतप्रधानही अयोध्येचा कार्यक्रम दिल्लीतून प्रतिकात्मक का करत नाहीत ?

News Desk

“हो मी धावता कोकण दौरा केला पण…”, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

News Desk