HW News Marathi
Covid-19

पुणेकरांना दिलासा | पुण्यात सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार, महापौरांची घोषणा

पुणे | महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव काही अंशी कमी झाला आहे. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये घट झाल्याचं दिसून येत आहे. मात्र राज्यातील काही शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत १५ जूनपर्यंत निर्बंधात वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (३० मे) काल याची माहिती दिली.

आता ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करुन त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येतील, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

पुण्यात दुकाने ७ ते २ या वेळेत सूरु राहतील

अशात पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुण्यात सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याची घोषणा केली आहे. पुण्यात १ जूनपासून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व दुकान सुरू राहणार आहेत. सोमवारी ते शुक्रवार पर्यंत दुकान सुरू राहणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

दूसरी चांगली बातमी ती म्हणजे पुण्यात दिवसभरात १८० नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. जिथे दिवसाला हजारांच्या घरात रूग्ण वाढत होते तिथे थेट २०० च्या आत हा आकडा आला आहे. गेल्या सहा महिन्यातील सर्वात कमी आकडेवारी ठरली आहे. तर दिवसभरात ७५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर २४ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सहा हजारांवर आहे.

शहरात एकूण ४ लाख ६९ हजार ९२७ जण कोरोनाबधित रुग्ण

दिवसभरात १८० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात ७५१ रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत ३३ रुग्णांचा मृत्यू, तर पुण्याबाहेरील ०९

– ८४४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६९९२७

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ६०२०

– एकूण मृत्यू -८२५६

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५५६५१.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४४३९

काय बंद आणि काय सुरू राहणार?

  • उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व दुकानांना परवानगी !
  • पुणे मनपा हद्दीतील सर्व दुकाने उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु करण्यास परवानगी दिली असून शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. PMPML, हॉटेल्स, उद्याने, जिम आदी आस्थापना बंदच राहतील.
  • पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने (Non-Essential Shops Stand alone shops and not inside Shopping Centers/Malls) सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • रेस्टॉरंट व बार हे फक्त पार्सल/घरपोच सेवेसाठी दिनांक १४.०४.२०२१ च्या आदेशानुसार सुरु राहतील.
  • पुणे महानगरपालिका क्षेत्रात ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू (Essential / Non-essential) यांची घरपोच सेवा (Home Delivery) सुरु करणेस मुभा राहील.

  • पुणे महानगरपालिका क्षेत्रात दररोज दुपारी ०३.०० नंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण (valid reason) / अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णतः प्रतिबंध (संचारबंदी) राहील. तसेच घरपोच सेवा देण्यास यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार परवानगी असेल.
  • पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक/कोरोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त ) २५% अधिकारी/कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील.

  • कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ०७.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस (Working days ) सुरु राहतील.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘लॉकडाऊन’नंतर सरकारकडे काय योजना आहे? कोरोनाच्या तिरडीवरून उठण्याआधीच उत्तर जनतेला मिळावे!

News Desk

केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळालीच पाहिजे | राहुल गांधी

News Desk

मुंबईकरांनो हे कधीही न पाहिलेले चक्रीवादळ, विनाकारण घराबाहेर पडू नका !

News Desk