HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

नोव्हेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्र पूर्ववत होणार – विजय वडेट्टीवार

मुंबई | कोरोनामुळे जाहीर झालेला लॉकडाउन ठाकरे सरकार टप्प्याटप्प्याने शिथील करत आहे. राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरु असून अनेक गोष्टींवरील निर्बंध उठवले जात आहे. बुधवारी गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली चित्रपट आणि नाटय़गृहे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान नोव्हेंबरच्या अखेपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विजय वडेट्टीवार यांनी यावेळी मुंबई लोकल सुरु करण्यासंबंधी लवकरच राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि रेल्वेवर निशाणा साधला. “रेल्वे सुरु करण्यासंबंधी खरं तर आमची चार पत्रं होती. त्याला परवानगी न देता काही त्रुटी काढल्या जात आहे.

सरकार आणि रेल्वेला क्रेडिट घ्यायचं असेल तर त्यांनी घ्यावं. आम्ही रेल्वे विभागाला तीन पत्रं पाठवली आहेत. त्यावर सुरक्षेसाठी काय करणार, गर्दी टाळण्यासाठी काय करणार आम्हाला विचारत आहेत. आम्ही सगळी यंत्रणा राबवत आहोत. राज्य सरकार याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेईल,” असं त्यांनी सांगितलं.

“राज्यातील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत असून या महिनाअखेर राज्यातील स्थिती पूर्वपदावर आणली जाईल. डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर येईल,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

Related posts

देशात गेल्या २४ तासात ९१९ नवे रुग्ण, ३१ जणांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू | केंद्रीय आरोग्य मंत्रालय

News Desk

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध – धनंजय मुंडे

News Desk

कोरोनामूळे सगळ्यात जास्त वयोवृद्ध दगावले

News Desk