HW News Marathi
महाराष्ट्र

…तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही !

बीड | “जो पर्यंत बीडमधील सर्व उमेदवारांना गुलाल लागणार नाही, तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही,” असा ‘पन’ ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत केला आहे. त्या आष्टी मतदार संघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचार सभेत बोलताना त्या म्हणाल्या होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार सुरेश धस आणि आणि भीमराव धोंडे यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.

“माझ्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. हे काही नवीन नाही, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे असतांना देखील सगळे लक्ष लागायच राष्ट्रवादीची लोक खोटा प्रचार करतात की पंकजा मुंडेना भिंती वाटते. मी महाराष्ट्रात प्रचारकरुन माझा मतदारसंघ सांभाळतें, मला चिंता महाराष्ट्राची आहे. बीड जिल्ह्यात एकही बंडखोरी नाही.

पाच वर्षात पालकमंत्री असतांना बीड जिल्ह्यात कारभार नाही, तर संसार केला असें पंकजा मुंडे सभेत म्हणाल्या. धनंजय मुंडे सारखे कर्तृत्वान नेते राष्ट्रवादी गेल्या मुळे राष्ट्रवादीचा भोपळा झाला असी टिका त्यांनी केली. माझी निवडणूक काही अवघड नाही, विजय आपलाच निश्चित आहे,असा विश्वास पंकजा मुंडेंनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी हे बुडणार जहाज आहेत सगळय़ाचा अंत जवळ आल्याने तें त्या जहाजात आहे. भाजपच्या मोठ्या जहाजात तारण्यासाठी अनेकांनी उड्या मारल्या आहे, असे म्हणत पक्षांतर करणाऱ्याना पंकजा मुंडेंनी चिमटा काढला आहे.

डोक्यात ताप गेला धनंजय मुंडेच्या तें म्हणातात की, “माझ्या भिंती ने मोदीची सभा घेते आहेत अरे पंकजा मुंडे कोणाला भिंत नाहीत मोदीजी लोकसभेतील अभूतपूर्व यशानंतर शाब्बास की देण्यासाठी म्हणून परळीत येत आहेत. प्रधानमंत्री आले तर बीड जिल्ह्याला कायम स्वरूपी दुष्काळ मूक्तीची घोषणा करू शकतील. भरघोस निधी मिळाला तर कष्ट संपतील राष्ट्रवादीच्या पणवती लोकाना विकासाच देन घेणे नाही. ते तर भकास गावचे राजे आहेत, अशी टिका धनंजय मुंडेवर केली. तसेच 370 वर टीका करणारे पाकिस्तानचे आहेत का ? राष्ट्रहित दिसत नसेल तर राष्ट्रवादीवाल्याचे नाव बदल पाहिजे..असे पंकजा मुडें म्हणाल्या

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऊसतोड कामगारांसाठी माजी पालकमंत्री पंकजा मुंडे झाल्या भावूक

News Desk

एकनाथ खडसेंना आम्ही वाळीत टाकले नाही, रावसाहेब दानवेंचे खडसेंच्या पक्षांतरावर उत्तर

News Desk

नितेश राणे यांनी लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र!

News Desk