HW News Marathi
देश / विदेश

UPSC 2019 चे निकाल जाहीर, देशात प्रदीप सिंह तर महाराष्ट्रात अभिषेक सराफ अव्वल

नवी दिल्ली | केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) ‘नागरी सेवा परीक्षा २०१९’चे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. यात प्रदीप सिंह याने देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्रातून अभिषेक सराफ हा पहिला आला आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये यूपीएससीच्या झालेल्या लेखी परीक्षा तसेच फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२० मध्ये घेतलेल्या मुलाखतीच्या आधारावर हे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

यूपीएससीच्या ‘नागरी सेवा परीक्षा २०१९’मध्ये एकूण ८२९ उमेदवारांना यश मिळाले आहे. या परीक्षेत प्रदीप सिंह हा देशात पहिला तर जतीन किशोर देशात दुसरा आला आहे. प्रतिभा वर्मा हिचा देशातून तिसरा तर महिला उमेदवारांमध्ये पहिला क्रमांक लागतो.

यूपीएससी ‘नागरी सेवा परीक्षा २०१९’मध्ये एकूण ८२९ उमेदवार उत्तीर्ण

  • जनरल – ३०४
  • आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग – ७८
  • ओबीसी – २५१
  • अनुसूचित जाती – १२९
  • अनुसूचित जमाती – ६७
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हे’ भाजपने ठाकरे सरकारविरोधात रचलेले कुटील षडयंत्र !

News Desk

“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे आता कुठे जातात ?”,खासदार कोल्हेंचा सवाल

News Desk

CDS बिपीन रावत रुग्णालयात दाखल, सूत्रांची माहिती

News Desk