HW News Marathi
Covid-19

कोरोनामुक्त झालेल्यांना ९ महिन्यांनी लस द्या ! केंद्र सरकारच्या पॅनलचा सल्ला

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या अ‍ॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन या पॅनलने कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना ९ महिन्यांनी कोरोनाची लस देण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी, खरंतर याच पॅनलने कोव्हीशिल्डच्या २ डोसांमधील अंतर वाढविण्याचा मुद्दादेखील चर्चेला आला होता. कोविशिल्डच्या २ डोसमधलं अंतर १२ ते १६ आठवडे इतके वाढवण्याच्या या सल्ल्यानंतर आता कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींचे ९ महिन्यांनी लसीकरण करण्याचा हा असा सल्ला देण्यात आला आहे.

कोव्हीशिल्डच्या २ डोसांमधील अंतर यापूर्वी ४ ते ८ आठवडे होते. अ‍ॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन या पॅनलने असा दिला की ही २ डोसांमधील अंतर १२ ते १६ आठवडे इतके वाढविण्याचा सल्ला दिला. त्यासाठी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहिती तपासून घेत एखाद्या व्यक्तीला दुसऱ्यांदा संसर्ग होऊ नये यासाठी हे २ डोसांमधील अंतर वाढवण्यात यावे असा सल्ला या तज्ञांच्या पॅनलने दिला होता.

‘इकॉनॉमिक टाइम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनामुक्त व्यक्तींनी किती महिन्यांनी लस घ्यावी याबाबत कालावधी वाढवण्याचा सल्ला दिला आहे. त्याचसोबत, गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनाही कोरोनाप्रतिबंधक लस देण्यात यावी असा सल्लाही या पॅनलने दिला आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पुढील काही दिवसांमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, WHO नुसार कोरोनामुक्त झाल्यानंतर सहा महिन्यांनी कोरोनाप्रतिबंधक लस घेणे सुरक्षित आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत सरकारने राज्यांना योग्य ‘ती’ आर्थिक मदत दिली पाहिजे, पवारांचे पंतप्रधानांना पत्र

News Desk

राज्य सरकारकडून वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता 

News Desk

देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ६,५६६ नवे रुग्ण, तर १९४ करोनाबाधितांचा मृत्यू

News Desk