HW News Marathi
महाराष्ट्र

भटक्या, निराधार व्यक्तींचं प्राधान्याने लसीकरण करा!, केंद्राकडून राज्य सरकारला सूचना

नवी दिल्ली | देशात कोरोनाचं सनकोट ओसरत आहे. कोरोना रोगावर मात करायची असेल तर लसीकरण हा एकाच उपाय आहे. त्यामुळे देशातील १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाचं लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. लसीकरणासाठी जनजागृतीही केली जात आहे. मात्र भटके आणि निराधार व्यक्तींना लस घेण्यास अडचणी येत आहेत. आवश्यक साधने नसल्याने रजिस्टर करू शकत नाहीत. यासाठी केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून भटक्या, निराधार व्यक्तींचं लसीकरण प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर यासाठी आराखडा आखण्यास सांगितला आहे.

भटक्या, निराधार व्यक्तींचं लसीकरण करण्यासाठी उपाययोजना केल्या

लसीकरण करणं महत्वाचा आहे पण लसीचा साठा अजूनही अपुरा आहे. देशातल्या नागिरकांचं लसीकरण तर होत आहे पण भटक्या आणि निराधार नागरिकांचं काय? “देशातील प्रत्येक नागरिकांना लस मिळाली पाहीजे. यासाठी राज्यांनी पुढाकार घेत योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहीजेत. भटक्या, निराधार व्यक्तींचं लसीकरण करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहीजेत. यासाठी समाजसेवकांची मदत घेता येईल. तसेच ६ मे रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचना पालन करावं”, असं केंद्रीय आरोग्य सचिव भूषण यांनी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

दुसरीकडे, सुप्रीम कोर्टाने मंगळवारी केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस जारी केली आहे. भटक्या, निराधार व्यक्तींच्या लसीकरणासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना ही नोटीस पाठवण्यात आली होती. सरकारकडून भटक्या आणि निराधार व्यक्तींच्या लसीकरणाबाबत माहिती मागवली आहे.

पुन्हा एकदा डेल्टा व्हेरिंएटबाबत धोक्याचा इशारा

देशात कोरोनाचं संकट ओसरत असलं तरी डेल्टा विषाणूचा धोका अद्यापही आहे. देशात आतापर्यंत ४६ कोटीहून अधिक जणांचं लसीकरण झालंआहे. यात १८ ते ४४ वयोगटातील २०.५४ लाख लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३ लाख लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात एक कोटीहून अधिक लोकांना लस दिली गेली आहे. यात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात चार कोटीहून अधिक जणांना लस दिली गेली आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी पुन्हा एकदा डेल्टा व्हेरिंएटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे परिस्थिती बिघडण्यापूर्वी त्याचा प्रसार कमी करावा लागेल असे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. वेगाने पसरणारा डेल्टाचा प्रकार, जो आधीच भारतात सापडला आहे, आता १३२ देश आणि प्रदेशांमध्ये आढळून आल्याचे आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंच्या सभेसाठी पुण्यात मिळाले मैदान

News Desk

‘…पंतप्रधान पाणीही विचारत नाही’, संजय राऊतांची नाराजी!

News Desk

BMC मध्ये उड्डाणपुलाच्या कामाच्या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा भाजप आमदाराचा आरोप

Aprna