HW News Marathi
Covid-19

खुशखबर! देशात ऑगस्टपासून मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ

नवी दिल्ली | कोरोनाचं संकट अद्यापही देशात कायम आहे. दिवसेंदिवस जरी रुग्णसंख्या कमी होत असली, तरीही संकट कायम आहे. कोरोनावर मत म्हणेज लसीकरण हा एकाच उपाय आहे. देशात लसीकरणाची मोहीम जानेवारी पासून सुरु झाली असून अनेक नागरिकांनी लस घेतली आहे. लहान मुलांना मात्र अद्याप लसीकरणाला सुरुवात झालेली नाही.

ऑगस्ट पासून लहान मुलांना लस उपलब्ध

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी हि महत्वाची माहिती दिली आहे. लांसाठी ऑगस्ट महिन्यापर्यंत लस येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम अद्यापही जाणवत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. अशात ही लस आलीच, तर ही दिलासादायक गोष्ट असेल.

देशात सध्या १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांनाच कोरोना लस देण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम मुलांवरही बघायला मिळाला आहे. तिसऱ्या लाटेत ही संख्या वाढू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मुलांसाठीच्या लसीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लसीकरणात महाराष्ट्र अव्वल स्थानी

राज्यात कोरोना विषाणू अजूनही थैमान घालत आहे. कोरोनाला हरवायचं असेल तर लसीकरण हा एकच उपाय आहे. देशात आणि राज्यात लसीकरणाला जानेवारी पासून सुरुवात झाली होती. महाराष्ट्र आता लसीकरणाच्या बाबतीत आघाडीवर आहे. राज्यात करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या आता एक कोटींहूनही अधिक झाली आहे. अशा प्रकारचा विक्रम करणारं महाराष्ट्र हे पहिलं आणि एकमेव राज्य ठरलं आहे.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

महाराष्ट्र लसीकरणाच्या बाबतीत आघाडीवर आहे याचं कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत नागरिकांचं आणि प्रशासनाचं कौतुक केलं आहे. करोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपलाच श्रेय हवे असेल तर केंद्राकडून मराठा आरक्षण मंजूर करून घ्या !

Gauri Tilekar

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण

News Desk

नौदलाची आयएनएस जलाश्व ही युद्धनौका मालदीवमध्ये दाखल

News Desk