HW News Marathi
देश / विदेश

वडेट्टीवार खाजगीत मराठा समाजाला ओबीसीत घेण्याचा सल्ला देतात अन् ! संभाजीराजेंची टीका

मुंबई | मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वाकयुद्ध देखील टोकाला गेले आहे. दरम्यान, एपीबी माझा या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना संभाजीराजेंनी विजय वडेट्टीवारांवर टीका केली आहे. “मंत्री विजय वडेट्टीवार खाजगीत बोलताना मराठा समाजाला ओबीसीत घ्या म्हणतात. तर बाहेर वेगळी भूमिका घेतात. त्यांचा हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे”, असे खळबळजनक वक्तव्य संभाजीराजेंनी केले आहे.

संभाजीराजे वडेट्टीवारांविषयी बोलताना म्हणाले कि, “विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेमुळे मी फार व्यथित आहे. मी यापूर्वीही स्पष्टपणे सांगितले आहे कि, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको. वडेट्टीवार मला म्हणाले होते की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास तयार आहोत. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो कि, कृपया असे करू नका. मात्र, बाहेर ते वेगळी भूमिका घेतात. आता विजय वडेट्टीवार असं का वागतात ते माहिती नाही”. त्याचप्रमाणे, यावेळी संभाजीराजेंनी आपल्या “तलवार काढू” या वक्तव्याबाबतही स्पष्टीकरण दिले आहे.

“मी कधीही ‘तलवार काढेन’ असे म्हटले नाही. समाजातील लोक आक्रमक होते. ‘आम्ही तलवार काढलीय, तुम्ही आदेश द्या’ असे म्हणत होते. म्हणून मी म्हणालो कि, ‘तुम्ही काही करू नका, गरज पडली तर मी आहे’. समाजाला शांत करण्यासाठी मी तसं बोललो. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मात्र, विजय वडेट्टीवारांच्या मनातली सारथी आणि माझ्याविषयीचा आकस पुन्हा समोर येत आहे. वडेट्टीवार माझ्याशी खासगीत बोलताना एक बोलले, आता दुसरं बोलतायत. त्यांचा यावरून महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे कि असं करू नये. त्यापेक्षा वडेट्टीवावरांनी माझं संपूर्ण भाषण ऐकावं”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अफजल गुरूच्या मुलाने केंद्रांकडे केली पासपोर्टची मागणी

News Desk

आता तुम्ही ड्रोन उडवू शकता… पण या आहेत अटी

News Desk

 शशिकला समर्थक ई पलानीस्वामीच तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

News Desk