HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर वैशाली झनकर यांना एसीबीकडून अटक!

नाशिक| लाच खाणं शिक्षणाधिकाऱ्याला चांगलंच भोवलं आहे. शिक्षण संस्था चालकांकडून मंजुरीच्या कामासाठी चालकामार्फत 8 लाख रुपयांची लाच घेणाऱ्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी पोलिसांच्या जाळ्यात सापडल्यात. एसीबीने त्यांना अटक केलीय. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. विशेष म्हणजे आजच त्यांनी वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला होता.

वैशाली झनकर यांच्या निलंबनाचे आदेश

शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी 8 लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांचा पाय आणखी खोलात गेलाय. लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्याकडे कोट्यवधींची ‘माया’ असल्याचं समोर येतंय. विशेष म्हणजे शासनाने देखील शिक्षण आयुक्तांना वैशाली झनकर यांच्या निलंबनाचे आदेश दिलेत. त्यामुळे आता शिक्षण आयुक्त काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

नेमकं काय घडलं?

शिक्षण अधिकारी वैशाली झनकर यांना अटक केली आहे. मंगळवारी सकाळी फरार झाल्या होत्या. या प्रकरणात शासकीय वाहन चालक आणि एका शिक्षकाला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याने दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, वैशाली झनकर यांनी काल नाशिकच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र त्यापूर्वीच ठाणे एसीबीने धडाकेबाज कारवाई करत वैशाली झनकर यांना बेड्या ठोकल्या. ठाणे अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या टीमने वेगाने सूत्रे हलवत वैशाली झनकर यांना अटक करण्यात यश मिळवले. आता झनकर यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण?

शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी 8 लाख रुपयांची लाच मागितली होती. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण आलंय. झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.

आरोपी शिक्षणाधिकाऱ्यांनी एका संस्था चालकांकडे सरकारकडून मिळणारं 20 टक्के अनुदान मंजूर करण्यासाठी ही लाच मागितली होती. संस्था मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरु करण्याच्या ऑर्डरची मागणी करत होती. ही ऑर्डर करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेकडून सुमारे 9 लाख रुपयांची लाच मागितली. यावेळी तक्रारदारांनी तडजोडीअंती 8 लाख रुपये देण्याचे कबूल केले. मंगळवारी (10 ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचला ठाणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचला आणि त्यात वैशाली झनकर अडकल्या गेल्या .

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात अनेक वर्ष राजकारण केलं, भाजपचा गंभीर आरोप

News Desk

‘महाविकास आघाडीत किती आलबेल हे त्यांच्या येरझाऱ्यांवरुनच दिसतंय’!

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील बर्ड फ्ल्यू परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार

News Desk