HW News Marathi
महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीकडून पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी उमेदवार जाहीर  

औरंगाबाद | राज्यातील ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षाकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत. नुकतंच वंचित बहुजन आघाडीकडून या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यात औरंगाबाद, पुणे आणि नागपूरच्या पदवीधर निवडणुकांसाठी वंचितने उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी वंचितने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.

वंचितचे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर

पदवीधर मतदारसंघ

  • औरंगाबाद – नागोराव पांचाळ
  • पुणे – सोमनाथ साळुंखे
  • नागपूर – राहुल वानखेडे

शिक्षक मतदारसंघ

  • पुणे – सम्राट शिंदे

राज्यात ५ पदवीधर मतदारसंघांची निवडणुक होणार आहे. यामध्ये ३ जागा पदवीधर मतदारसंघ तर २ जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर आहे. १३ नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख १७ नोव्हेंबर आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांबद्दल आम्हाला आदर, पण सोनिया गांधींच आमच्या नेत्या, कॉंग्रेसची ठाम भूमिका

News Desk

मुंबई महापालिकेने केलेली कारवाई महापालिकेच्या नियमानुसारच केली – किशोरी पेडणेकर

News Desk

गौरी सावंत यांच्या तृतीयपंथी मातृत्वाची उलगडली कथा !

News Desk