HW News Marathi
महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर

मुंबई | वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर वंचितने काल (३० सप्टेंबर) दुसरी यादी जारी केली आहे. या यादीत १२० जणाच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. तर पहिल्या यादीत २२ जणांचे नाव होते. आतापर्यंत १४२ उमेदवारांची यादी जारी केली आहे. उर्वरित उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करू असे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमसोबत असेलेली वंचितची आघाडीत बिघाड झाला. यानंतर दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी जारी करताना समाजातील वंचित आणि दुर्लक्षित राहिलेल्या समूहांना संधी देण्याचे वंचित बहुजन आघाडीचे धोरण असलणार असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले गोपीचंद पडळकर यांनी काल (३० सप्टेंबर) प्रवेश केला. यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पडळकर निवडणुकीनंतर परत येतील असा टोलाही त्यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शरजील या कारट्याला आमच्याकडे सोपवा”, नितेश राणेंचा संताप!

News Desk

जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, मागासांना आरक्षणाचा सर्वाधिक लाभ द्या, आठवलेंची मागणी

News Desk

मनसेच्या आजच्या बैठकीत राज ठाकरेंची सुनही उपस्थित

News Desk