HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबाद महापालिकेत ‘वंदे मातरम’वरून तोडफोड, video

औरंगाबाद महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होताना नेहमीप्रमाणे वंदे मातरम वाजविण्यात आले. मात्र या वेळी एमआयएमचे आणि काँग्रेसचे मुस्लीम नगरसेवक जागेवर बसूनच होते. त्यामुळे संतापलेल्या शिवसेना नगरसेवकांनी त्यांना जाब विचारला. या बाचाबाचीचे पर्यवसान गदारोळात झाले. अखेर महापौरांनी सभा दहा मिनिटांसाठी स्थगित केली.

त्यानंतरही सभा सुरू झाल्यानंतर गदारोळ कायम राहिला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी हौद्यात दाखल हेत, एमआयएमच्या नगरसेवक आणि नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे संतापलेल्या एमआयएम नगरसेवकांनी सभगृहातील पंखे, माइक आदी वस्तूंची मोडतोड केली. या गदारोळात सभागृहाचे कामकाज पुन्हा स्थगित करण्यात आले. तसेच एमआयएमचे सय्यद मतीन, शेख जफर व काँग्रेसचे सोहेल शेख यांच्यासह तिघांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला, दरेकरांचा संजय राऊतांवर आरोप

News Desk

एसटीच्या कर्मचाऱ्यांवर न्यायालयाकडून अवमान याचिका दाखल करण्याच्या सूचना

Gauri Tilekar

मुंबईत बॉम्बस्फोट कट प्रकरणी एटीएसकडून आणखी एकाला अटक!

News Desk