मुंबई | शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश ईडीने दिले होते. त्यावर वर्षा राऊत यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. ५ जानेवारीला वर्षा राऊत चौकशीसाठी जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आजच(४ जानेवारी) ईडी कार्यालयात हजर होत वर्षा राऊत यांनी सगळ्यांना धक्का दिला आहे. वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल होताना शिवसेनेकडू शक्ती प्रदर्शन केलं जाणार असल्याची चर्चा होती. पण त्या चर्चांना संजय राऊत यांनी ब्रेक दिला होता.
Maharashtra: Varsha Raut wife of Shiv Sena MP Sanjay Raut reaches Enforcement Directorate office in Mumbai.
She was summoned by ED to appear before it in connection with PMC Bank scam case.
— ANI (@ANI) January 4, 2021
पीएमसी बँकेतील घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना २९ डिसेंबरला ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर वर्षा राऊत यांनी ५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. वर्षा राऊत यांना PMC बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास सांगितलं आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली होती.
पीएमसी बँक खोटे खाते दाखवत एका रियल इस्टेट डेव्हलपरला जवळपास 6500 कोटी रुपये कर्ज देत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेला 2019 मध्ये मिळाली होती. हा व्यवहार होऊ नये आणि पैसे वाचावे या हेतूने रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर २४ सप्टेंबर २०१९ला निर्बंध लादले. हे निर्बंध ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.