HW News Marathi
महाराष्ट्र

सुशांत सिंह राजपूतच्या आत्म्हत्येवर अमृता फडणवीस आणि युवासेनेचे वरुण सरदेसाई यांच्यात ट्विटर वॉर

मुंबई | सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यात संघर्ष सुरू झाला असतानाच ट्विटर वरती एक वेगळाच वाद सुरू झाला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेत पुन्हा एकदा ट्विटर वॉर रंगला आहे.

युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी मिसेस फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. “मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याच मुंबई पोलिसांची सिक्युरिटी कव्हर (पोलिस संरक्षण) घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की सिक्युरिटी कव्हर भरोसा नसेल तर !!” अशा शब्दात सरदेसाई यांनी आव्हान दिले आहे.

 

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचे प्रकरण हाताळण्यावरुन मिसेस फडणवीसांनी मुंबई पोलिसांवर नाव न घेता निशाणा साधला. त्यावर युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले जात आहे – मला वाटते मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष, स्वाभिमानी नागरिकांसाठी जगणे यापुढे सुरक्षित वाटत नाही” अशा आशयाचे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गडचिरोली | पोलिसांच्या कारवाईत १६ नक्षलवादी ठार

News Desk

गोपीचंद पडळकरांकडून बैलगाडी शर्यतीचे होणार आयोजन…!

News Desk

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण : आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप

News Desk