HW News Marathi
महाराष्ट्र

मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार – वरुण सरदेसाई

मुंबई | भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडीच्या प्रकरणात थेट वरुण सरदेसाईंना ओढल्यानं मोठं राजकारण सुरू झालंय. त्यालाच आता युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं आहे. मी सुसंस्कृत कुटुंबातील आहे. मला राजकारणाची आवड आहे. पण आज जे आरोप केले तसे कामं माझ्याकडून घडणारही नाहीत, असंही स्पष्टीकरण वरुण सरदेसाई यांनी दिलं आहे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

”राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल”

राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, आज ते भाजपमध्ये गेलेत तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही, असंही वरुण सरदेसाई म्हणाले आहेत.

मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार

त्यांनी जे आरोप केलेत, ते सिद्ध करावेत नाही तर कायदेशीर प्रक्रियेला तयार राहावे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केलेत. ते सगळे आरोप तथ्यहीन असून, त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकत आहे, असंही वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट केलं आहे.

मी सुसंस्कृत कुटुंबातील, मला राजकारणाची आवड – वरुण सरदेसाई

आपण सगळे मला युवासेनेचा सचिव म्हणून ओळखता. त्याच्या आधीची मी माझी पार्श्वभूमी सांगतो. दहावीत मला ९१ टक्के गुण मिळाले. त्यानंतर बारावीत मला डिस्टिन्क्शन मिळालं. त्यानंतर मुंबई विद्यापीठात मी सिव्हिल इंजिनीअरची पदवी मिळवली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेल्या अशा जगातील प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठात मी मास्टर्स इन सिव्हिल इंजिनीअरची पदवी मिळवली. ही पदवी अगदी एका वर्षात मिळवली. मी ते करून परत आलो.

माझ्या वडिलांचा व्यवसाय आहे. युवा सेनेत काम करत असताना मी युवा सेनेत काम करतो. माझे वडील मॅकेनिल इंजिनिअर आहेत. त्याचबरोबर माजे आजोबाही इंजिनिअर आहे. मी सुसंस्कृत कुटुंबात आहे. मला राजकारणाची आवड आहे. पण आज जे आरोप केले तसे कामं माझ्याकडून घडणारही नाहीत, असंही वरुण सरदेसाई म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

४० वर्षे भाजपची सेवा केली हे चुकलं का? भाजप नगरसेवकाने लावले नाराजीचे होर्डिंग्ज!

News Desk

#CoronaVirus : कोणत्याही शहराला ‘लॉकडाऊन’ करणार नाही !

swarit

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात अखेर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डींचे निलंबन

News Desk