HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

वाणी समाजाचे ज्येष्ठ नेते वसंतराव वाणी यांचे निधन

पुणे | वाणी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य वसंतराव वाणी यांचे काल (१५ सप्टेंबर) पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. वसंतराव वाणी हे पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. पक्षाचे प्रदेश समन्वयक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मात्र, काही कारणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. भाजपच्या राज्य कार्यकारणीचे ते सध्या सदस्य होते.

कार्यकर्ता उभारणीच्या कामात व त्याच्या जडण घडणीत, त्याला विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच असायचा. ध्यास घेऊन पक्ष विस्ताराच्या कामातील शहरातील कार्यकर्त्याच्या भावनेशी एकरुप झालेला लढवय्या नेता आज आपल्यातून निघून गेला. ही जिवाला चटका लावणारी घटना आहे, अशी भावना भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

Related posts

पंतप्रधान मोदींना आशीर्वाद देणारा मी कोण ?

News Desk

…तर मुलाने मुलासारखे वागले पाहिजे !

News Desk

उध्दव ठाकरेंच्या सभेला उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनाची ना !

News Desk