मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १२५ उमेदवारांची नावे यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण-पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढविणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना १२४ जागांवर आणि भाजप १६४ आणि मित्रपक्ष १८ जागांवर लढणार आहे.
भाजपने ५२ जागांवर सिटींग उमेदवार देण्यात आले आहेत. तर पुण्याच्या कोथरूड मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील ८ जागांवर भाजपचे उमेदवार असणार आहेत. यात शिवसेनेला हडपसर, कोथरूड आणि शिवाजीनगर मतदारसंघ सुटणार असल्याची अशा होती. मात्र, भाजपने शिवसेनेला पुण्यात ठेंगा दाखविला आला आहे.
पुण्याच्या ८ जागा यादीनुसार
- वडगाव शेरी – जगदीश मुळीक,
- शिवाजीनगर – सिद्धार्थ पद्माकर शिरोळे,
- कसबा पेठ – मुक्ता टिळक,
- हडपसर – योगेश टिळेकर,
- पुणे कान्टोन्मेंट – सुनिल कांबळे,
- कोथरूड – चंद्रकांत पाटील,
- पर्वती – माधुरी मिसाळ,
- खडकवासला – भिमराव तपकीर
पुण्याच्या ८ जागेवर भाजपने त्यांच्या उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेला हडपसर मतदारसंघ मिळेल अशी आशा होती. मात्र, भाजपने विद्यमान आमदारांना जागा द्यावे, असे सांगत हडपसर देखील भाजपने स्वत:कडे ठेवले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.