HW News Marathi
महाराष्ट्र

“खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करा”, विजय वडेट्टीवारांचा पडळकरांवर पलटवार!

नागपूर | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात सध्या मतभेद सुरु आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पडळकरांच्या या आरोपावर वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बाबा रे तुला काय बोलायचं असेल तर पुराव्यानिशी बोल. बेछूटपणे काही आरोप करू नकोस. खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध कर. नाही तर आज तुला नोटीस देणार आहेच. हे माझं ठरेललं आहे, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. पडळकरांवर 50 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

नाही सांगितलं तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन

विजय वडेट्टीवार यांनी अगदी संतापजनक प्रत्युत्तर गोपीचंद पडळकरांना दिलं आहे. “पडळकरांनी ऐकिव गोष्टीवर आरोप करू नये. वास्तव गोष्टींवर आरोप करावेत. आता ते कार्यकर्ते राहिले नाहीत. आमदार झाले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा. कोणत्या नातेवाईकाची आहे हे सांगावं. नाही सांगितलं तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन. कोर्टात जाईल. माझी कोणत्याही दुकानात भागिदारी नाही. असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करावी”, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

पडळकर खऱ्या बापाची औलाद असेल तर…

पडळकर यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावे, पुरावे द्यावे, आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेल. माझ्या नावाने, माझ्या नातेवाईकांच्या नावे कुठलंही दारुचे दुकानं नाही. छत्तीसगडमध्ये कंपनी नाही. पडळकर खऱ्या बापाची औलाद असेल तर, तर त्यांनी आरोप सिद्ध करावे, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.

पडळकर खरंच ओबीसींसाठी काम करणार असेल तर…

इयत्ता सातवीपर्यंत शिकलेला चंद्रपुरातील एक माणूस केंद्रात मंत्री होता. माझ्या आईने कष्ट करुन मला शिकवलं. संघर्षातून मी शिकलो. चळवळीतून घडलो. ओबीसी चळवळीला बदनाम करण्याचं काम पडळकर करतात. सुपारी घेऊन चळवळ संपवण्याचं काम ते करत आहेत. पडळकर खरंच ओबीसींसाठी काम करणार असेल तर त्यांनी सोबत यावं. चंद्रशेखर बावनकुळे कधीही पातळी सोडून बोलत नाहीत. ओबीसींचं नुकसान होणार नाही ही माझी आणि बावनकुळेंची भूमिका आहे, असं सांगतानाच भाजपमध्ये जाणार नाही असं कुलदैवताची शपथ घेऊन पडळकर भर सभेत बोलले होते. त्याचं काय झालं?, असा सवालही त्यांनी केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रत्नागिरीत १९ पैकी १४ जण कोरोना निगेटिव्ह तर ५ जण स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह

swarit

धार्मिक व जातीय सलोखा कायम ठेवावा! – उपमुख्यमंत्री

Aprna

ED चे अधिकारी आता कमळ हातात घेण्याच्या तयारीत ?

News Desk