HW News Marathi
महाराष्ट्र

राजा रयतेचा असतो समाजाचा नसतो,तलवार कुणा विरोधात उपसणार? विजय वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना प्रश्न

मुंबई | मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण आणि राजकारण तापले आहे. आझ (९ ऑक्टोबर) उस्मानाबाद येथे राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाविरोधात केलेल्या मोर्च्यात सरकारला इशारा दिला. गरज पडली तर तलवार काढू असे त्यांनी म्हटले आहे. यावर मंत्री विजय वड्डेटीवार यांनी उत्तर दिले आहे. एमपीएससी परीक्षा रद्द करण्याची मागणी मराठा संघटना करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली आहे. यावेळी संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“राजा रयतेचा असतो समाजाचा नसतो, तलवार कुणा विरोधात उपसणार? ओबीसी विरोधात, दलित विरोधात? तलवारीची भाषा का? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी विचारला आहे. तडजोडीची भाषा असली पाहिजे. एमपीएससी परीक्षेत २०० जागा आहेत. त्यात २३ जागा ह्या मराठा समाजासाठी आहेत. अडीच लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. वय जात, लग्नाचे प्रश्न असतात. माझी भूमिका विचारली तर परीक्षा व्हावी असे माझे मत आहे. पण त्यात कोणत्याही समाजाचे (मराठा समाज) नुकसान व्हावं अस नाही. म्हणून राजांना सांगतो मध्य मार्ग काढता येतो. हे राजकारण कशाला? शाहू महाराजांनी पुरोगामी विचार मांडले आहेत. एक समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये”, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

काय म्हणाले खासदार संभाजीराजे छत्रपती?

संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा सरकारला दिला आहे. आम्ही भीक नाही तर हक्क मागत आहोत. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असंही संभाजीराजे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्रकारितेच्या नावाखाली अजेंडा रेटणाऱ्या ‘अभिनेत्यावर’ कारवाई होताच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवतं, रोहित पवारांचा सवाल

News Desk

संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणेंना अटक होणार? आज सुनावणी

Aprna

मराठा समाजातील संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम आहे – उदयनराजे भोसले

News Desk