HW News Marathi
महाराष्ट्र

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरांचा राजीनामा

मुंबई। भाजप नेत्या विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पदाचा राजीनामा दिला आहे. रहाटकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. सरकार बदलल्यानंतर महामंडळ, आयोग तसेच समित्यांवर नवीन नियुक्त्या केल्या जातात. त्यानुसारच विजया रहाटकर यांच्या जागी महिला आयोगावर नवीन अध्यक्ष नेमण्याचे निर्देश दिले होते, मात्र रहाटकर या अध्यक्षपद सोडण्यास तयार नव्हत्या. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र तिथेही त्यांच्या बाजूने निर्णय लागला नाही. यानंतर राहटकरांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.

२०१३ मधील एका जनहितार्थ याचिकेवरील सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत राजकीय शेरेबाजी केली होती. सरकार बदलले असताना आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा का दिला नाही, असे त्यामध्ये म्हटले होते. मात्र, आयोगाचे अध्यक्षपद अराजकीय स्वरुपाचे असल्याने आणि आयोगाच्या कायद्यातील कलम (४) अन्वये, या पदाला संरक्षण असल्याने पदावरुन दूर करण्याबाबत राज्य सरकारला कायदेशीर प्रक्रियेचे अवलंब करावा लागेल, असे सांगत रहाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

आयोगाचा १९९३ मधील कायद्यातील कलम (४) अन्वये, पदाचा गैरवापर केल्याचे सिद्ध झाल्यास अध्यक्षपदावरून दूर करता येते. त्यामुळे या संदर्भात राज्य सरकारला विशेषाधिकार नाहीत, असे दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदारांना घरे देण्यापूर्वी शेतकऱ्यांना व एसटी कर्मचाऱ्यांना पैसे द्या; चंद्रकांत पाटलांनी सरकारला बजावले

News Desk

पूरस्थितीत मदतीला विलंब लागल्यानेच…. देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा

News Desk

पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश, आपत्कालीन मदत यंत्रणेचे मानले आभार

News Desk