HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई

विकास दुबेचे २ साथीदार अटकेत, दया नायक यांनी केली कारवाई

ठाणे | कुख्यात गुंड विकास दुबे काल (१० जुलै) पोलीस चकमकीत ठार झाला. आज त्याच्या २ साथीदारांना ठाण्यात अटक करण्यात आली आहे. आता विकास दुबेचे साथीदार असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा ड्रायव्हर सोनू त्रिवेदी या दोघांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र एटीएसचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी ही कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या ८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात विकास दुबे हा मोस्ट वॉन्टेड होता. त्याचा चकमकीत खात्मा झाला. या घटनेनंतर त्याचे साथीदार फरार झाले होते. यातले दोघे ठाण्यात लपल्याची माहिती दया नायक यांना मिळाली होती. ज्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली.

 

Related posts

राज्यांत आज ९५१८ नवे रुग्ण तर ३०९६ रुग्ण झाले कोरोनामुक्त!

News Desk

पोलिस उप-अधीक्षक विशाल ढुमे पाटलांना कारने उडवण्याचा प्रयत्न

Ramdas Pandewad

…आणि बीडचे ‘ते’ वसतिगृह पुन्हा जिल्ह्यातील मुलींसाठी खुले झाले !

News Desk