HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी आपल्याच हातात स्टेअरिंग आहे असं म्हणू द्या, पण अजितदादांनी ट्विट करुन सगळं सांगितलं – विनायक मेटे

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६०वा वाढदिवस असून त्यांना सर्वांकडून शुभेच्छा येत आहेतच. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री १२ वाजता जो फोटो टाकत त्यांना शुभेच्छा दिल्या, तो फोटो चर्चेचा विषय बनला. काल (२६ जुलै) सामनात झालेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणाले होते की महाविकासआघाडीचे स्टेअरिंग माझ्याच हातात आहे. आणि आज (२७ जुलै) अजित पवारांनी जो फोटो शेअर केला आहे त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच गाडीत बसले आहेत मात्र स्टेअरिंग उपमुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. यावरुन भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांनी निशाणा साधला आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी आपल्याच हातात स्टेअरिंग आहे अस म्हणू द्या, पण अजितदादांनी ट्विट करुन सग सांगितलं आहे. आम्हाला काय म्हणायचे आहे ते अजित पवारांनी सांगितले आहे.  अजित पवार हे मंत्रालयात बसून काम करतात.सध्या महाराष्ट्राचे स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे त्यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. परंतु, हे सरकार दुसरं कोणी पाडायची गरज नाही. ते स्वत:च पडेल’, असे विनायक मेटे म्हणाले.

इतकेच नव्हे, तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, अजित पवार आणि शरद पवार असे तीन मुख्यमंत्री आहेत असेही त्यांनी म्हटले. दुर्दैवाने काँग्रेस या सगळ्यातून बाहेर आहे. आपण सरकारमध्ये आहोत हे काँग्रेस स्व:त मान्य करत नाही. काँग्रेस फक्त नावापूरता सत्तेत आहे. खरे बघायला गेले तर दोनच पक्ष सरकारमध्ये आहेत, असेही मेटे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेत्यांनंतर आता राज्यपाल कोश्यारीही दिल्लीत अमित शहा यांची घेणार भेट!

News Desk

गोहत्याबंदीबाबत फेरविचार शक्य – माधव भांडारी

News Desk

ही उद्धवशाही नसून बेबंदशाही, नारायण राणेंचा गंभीर आरोप

News Desk