HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचे कालचे भाषण म्हणजे केवळ पोकळ घोषणा, विनायक मेटेंचा वार

पुणे | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर आज पुण्यात शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली यावरुन सरकारला थेट आरोपी ठरवले आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाच्या बाबतीत भाष्य केले. महाविकास आघाडी सरकार सर्व समाजाच्या पाठीशी उभे आहे असे ते म्हणाले होते. यावर विनायक मेटे यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. घोषणा करु नका आधी करुन दाखवा असे विनायक मेटेंनी म्हटले आहे.

“मुख्यमंत्र्यांनी काल जे भाषण केलं आणि घोषणा केल्या त्या केवळ पोकळ घोषणा होत्या. उद्धव ठाकरेंना मी इतकेच सांगू इच्छितो की सगळ्यांना न्याय देण्याच्या गोष्टी नंतर करा जो न्याय याआधी फडणवीस सरकारने दिला होता, जे आरक्षण दिले होते ते तुम्हाला टिकवता आले नाही. या मुलांच्या नोकऱ्या देणं तुमच्या हातात आहे. ते तुम्ही देत नाही मग तुम्ही कोणाला आणि कसला न्याय देणार? याचं उत्तर द्या. आधी न्याय द्या मग बोला. धनगर समाज, मुस्लिम समाज, ब्राम्हण समाज आरक्षण मागत आहेत, मग त्यांना आरक्षण द्या. उद्धव ठाकरेंवर आमचा मुख्यमंत्री म्हणून विश्वास आहे.पण त्यांना दिलेल्या चुकीच्या सल्ल्याने आज मराठा समाज रस्त्यावर आला आहे, असेही मेटे म्हणाले आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

Aprna

सोनिया सेना आणखी किती गळे दाबणार? – कंगना राणावत

News Desk

फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय!

News Desk