HW News Marathi
महाराष्ट्र

“सत्तेसाठी लाचारी म्हणजे नारायण राणे”- विनायक राऊत

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचा खासदार विनायक राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. लाचारी हा शब्द लागू होणारी व्यक्त म्हणजेच ‘नारायण राणे’ अशा शब्दात राऊत यांनी राणेंवर टिकास्त्र सोडले आहे. एका वर्षात त्यांनी त्यांचा पक्ष बुडवला. स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी लाचारी पत्करली, अशा घणाघात राऊत यांनी गुरूवारी राणे यांच्यावर केला. उद्धव ठाकरे हे शिवसैनिकासह मुख्यमंत्री देखील आहे. मुख्यमंत्र्यांना आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशी भावना विनायक राऊत यांनी व्यक्त केली.

…तरच देश कोरोनामुक्त होईल

डिसेंबरपर्यंत जेष्ठ नागिरकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे सरकारचे काम आहे. तरूणांसह जेष्ठांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण झाले तरच देश कोरोनामुक्त होईल,असे राऊत म्हणाले. देशाने गुरूवारी लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा ओलांडला. ही बाब अत्यंत आनंदाची आहे. या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन, अशा शब्दात राऊत यांनी देशाला आणि महाराष्ट्रवासियांना शुभेच्छा दिल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार अन् राजकीय सहभाग झालेला नाही! – अजित पवार

Aprna

समान सत्तावाटपातही इतके वाट्यास आले नसते, सामनातून काँग्रेसवर बोचरी टीका

News Desk

कृषी पंपांचे थकीत वीजबील भरा नाही तर वीज खंडीत करणार

News Desk