HW News Marathi
महाराष्ट्र

‘फडणवीसांना शह देण्यासाठी केंद्राने नारायण राणे यांचा बुजगावणं म्हणून वापर’- विनायक राऊत

मुंबई | शिवसेना आणि भाजप मध्ये सध्या वादावादीचं वातावरण दिसून येतंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन केलं आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलाच वाद पेटला आहे. शिवसैनिकांनी ही जागा गोमूत्र आणि दुधाने शुद्ध करुन घेतल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा वाद रंगला आहे. त्यातच रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनीही राणेंवर टीकेची तोफ डागली आहे.

नारायण राणेंचा बुजगावण्यासारखा वापर करतंय

विनायक राऊत यांनी नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीसवर चांगलाच निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांना नामोहरम करण्यासाठी केंद्र सरकार नारायण राणेंचा बुजगावण्यासारखा वापर करतंय, यासाठीच त्यांना पुढे आणलं आहे. फडणवीसांना शह देण्यासाठी राणेंचा वापर केला जाणं हे भाजपचं दुर्दैव आहे. नारायण राणेंसारख्या बाटग्याला बाळासाहेब कधीच आशिर्वाद देणार नाहीत. बाळासाहेबांनी नारायण राणेंना शाप दिला आहे की तुझ्यासारखा कृतघ्न आणि नतद्रष्ट माणूस महाराष्ट्रात जन्माला येऊ नये, असं म्हणत विनायक राऊतांनी राणेंवर टीका केली आहे.

ज्यांना गोमूत्र शिंपडायचं आहे त्यांना शिंपडून द्या

नारायण राणे यांनी शिवसैनिकांवर टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले, ” ज्यांना गोमूत्र शिंपडायचं आहे त्यांना शिंपडून द्या. ते स्मारक दलदलित आहे. फोटो पण साहेबांचा नीट दिसत नाही. आधी स्वतःचं मन शुद्ध करा. येऊ देणार नाही असं म्हटलं पण आम्ही गेलो तेव्हा तिथे कुणीच नव्हतं. मी जर त्यांचा पुत्र असतो तर येऊच दिलं नसतं. आणि शुद्धीकरण करायला ब्राह्मण लागतात ते कुठे होते? आम्हाला सांगा आमच्याकडे ब्राह्मण आहेत, आम्ही दिले असते”, असा हल्लाबोल राणे यांनी केला आहे.

दलदलीत ते स्मारक

नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले कि, “फक्ता गोमूत्रं आणि गोमूत्रं या एकाच विषयासाठी आलो आहोत का? मला कुणाला नमस्कार करावा वाटतो, कुणासमोर विनम्र व्हावं वाटतं हा माझा प्रश्न आहे. ते गोमूत्रं ज्यांना शिंपडायचं त्यांना शिंपडू द्या. ज्यांना प्यायचं त्यांना पिऊ द्या. त्यात माझा काय संबंध आहे. ज्यांनी शिंपडलं त्यांना विचारा. काय दुषित झालं होतं. एवढं जर स्मारकाचा अभिमान असेल ना ते स्मारक ज्या स्थितीत आहेत. तिथे जाऊ शकत नाही. पँटवर करून मी आत गेलो. दलदलीत ते स्मारक आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे आहेत. अनेक स्मारकं मी पाहिलं. अत्यंत सुशोभित असतात. लॉन आहे. फुलझाडं आहेत. इथे काय आहे. इथे तर फोटोही साहेबांचा दिसत नाही. जे गोमूत्रं शिंपडायला आले ना त्यांनी जागतिक किर्तीचं स्मारक करण्याचा प्रयत्न करा. मग कारभार करा”, असं ते म्हणाले आहेत.

मी असतो तर उभा राहिलो असतो, अडवलं असतं

शिवसेनेने नारायण राणेंना स्मारक जवळ न येऊ देण्याचा इशारा दिला होता. यावर देखील राणे यांनी टीका केली आहे. “राणेंना येऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला होता. पण मी पोहोचलो. तिथे कुणीही नव्हते. उद्धव ठाकरेही नव्हते. मी असतो तर उभा राहिलो असतो, अडवलं असतं. हे काय आहे. पाच सहा जणांना दोनशे दोनशे रूपये देऊन शुद्धीकरणासाठी पाठवलं. तिथे ब्राह्मण हवा होता शुद्धीकरणासाठी आमच्याकडे भरपूर आहे. आम्ही घेऊन गेलो असतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबाद महापालिकेत ‘वंदे मातरम’वरून तोडफोड, video

News Desk

मोदी हे आधुनिक भारताचे लोहपुरुष | उदयनराजे भोसले

News Desk

शेतकरी-शेतमजूरांच्या पाल्यांसाठी शुभमंगल योजना

News Desk