HW News Marathi
Covid-19

जे जे रुग्णालयातील करोना रुग्णालयांसाठी नोडल ऑफिसर पदी विनिता सिंघल यांची नेमणूक

मुंबई | जे.जे. समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी.टी.रुग्णालय येथे करोना ग्रस्तांसाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी सनदी अधिकारी विनिता सिंगल यांची नेमणूक करण्यात करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज( २७ मार्च) येथे दिली.

जे जे समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालयात ३०० खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि ६० खाटांचा आयसीयू विभाग असेल त्याचप्रमाणे जीटी रुग्णालयात २५० खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि ५० खाटांच्या आयसीयू विभागाची व्यवस्था करण्यात येत आहे. ही दोन्ही रुग्णालये लवकरच सुरू होत आहेत. मुंबईप्रमाणे पुणे येथेही स्वतंत्र सातशे खाटांच्या करोना रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी १०० खाटा आयसीयू साठी असतील, अशी माहितीही अमित देशमुख यांनी दिली आहे

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारनंच अदर पुनावालांना धमकी दिली, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

News Desk

देशातील सर्व स्मारकं आणि संग्रहालय १६ जूनपासून खुली होणार!

News Desk

राज्यात सद्यस्थितीत एकूण ८५ हजार १४४ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण

News Desk