HW News Marathi
महाराष्ट्र

विराट-अनुष्काला ‘कन्यारत्न’!

मुंबई | भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. अनुष्काने आज (११ जानेवारी) मुलीला जन्म दिला असून विराटने ट्विट करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली आहे.

आम्हाला दोघांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांसाठी आम्ही खूप आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघीसुद्धा ठीक आहेत आणि आमचं हे सौभाग्य आहे की आम्हाला आयुष्यात ही गोष्ट अनुभवता आली. यावेळी आम्हाला थोडी प्रायव्हसी हवी असेल हे तुम्ही नक्कीच समजू शकता असं आम्ही समजतो, अशा आशयाची पोस्ट विराटने शेअर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCB ची टीम शाहरूख खानच्या मन्नतवर दाखल!

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ‘या’ कारणामुळे नाराज?

News Desk

मुख्यमंत्री 12 सदस्यांची नवीन यादी राज्यपालांकडे पाठवणार, सूत्रांची माहिती

Aprna