HW News Marathi
Covid-19

राज्याचे कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबत अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तसेच, विरोधी पक्षातीलही अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली. दरम्यान, राज्याचे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करत त्यांनी स्वत: माहिती दिली आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कदम घरीच विलगीकरणात असून उपचार घेत आहेत.

काय म्हणाले विश्वजित कदम?

“माझा पलूस कडेगांव मतदारसंघ, सांगली जिल्हा, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा पाठपुरावा, कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना, मंत्रालयातील बैठका, भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने पूरपरिस्थिती दौरे, भारती विद्यापीठ कामकाज, अशा धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु अखेर मला कोरोना संसर्ग झालाच! थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करून घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो”.

“गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी बाळगावी ही विनंती. माझ्या तब्येतीला कोणताही धोका नाही. वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घरीच विलगीकरणात मी उपचार घेत आहे. माझे कार्यालय नियमित सुरू असून मी देखील फोनच्या माध्यमातून उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करेन. संसर्गातून पूर्ण बरा होत लवकरच आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन, हा विश्वास व्यक्त करतो”.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे महिनाभरात १३५ मृत्यू; लसीकरणाला गंभीरतेने घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Aprna

चिंता वाढली ! राज्यात आज ८ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

राज्यात आज ६ हजारांहून अधिक ‘कोरोनामुक्त’, रिकव्हरी रेटही ९० टक्क्यांवर

News Desk