HW News Marathi
महाराष्ट्र

विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा विनयभंग केला नाही !

मुंबई | “महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात पिरगळला नाही. त्यांनी माझा विनयभंग केलेलाच नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलीसांकडे तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही”, असा दावा करत सांताक्रूज आंदोलनातील ‘त्या’ महिलेने आपली भूमिका मांडली आहे. “महाडेश्वर यांनी एका महिलेचा विनयभंग केला, त्यांनी महिलेचा हात मुरगळला” असा संदेश पसरविणारा तो व्हिडिओ व्हायरल करण्यामागे राजकीय पक्षाचा विश्वनाथ महाडेश्वर सरांची बदनामी करण्याचा हेतू आहे”, असेही मत या महालेने म्हटले आहे. “आम्ही हातांची साखळी करून महापौरांना रस्त्यात रोखले असता महाडेश्वर सरांनी फक्त माझा हात बाजूला केला, त्यांनी माझा हात पिरगळला नाही”, असे ‘त्या’ महिलेने स्पष्ट केलं आहे. एका व्हिडिओद्वारे आपले हे मत या महिलेने व्यक्त केले आहे.

“ह्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे माझी आणि महाडेश्वर सरांची विनाकारण बदनामी होत आहे. प्रत्यक्षात माझा विनयभंग झालेलाच नाही. मी महाडेश्वर सरांच्या विरोधात पोलीसांकडे विनयभंगाची तक्रार दाखल करावी, यासाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी माझ्याकडे सतत आग्रह धरत आहेत. पण मला राजकारणात अजिबात रस नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही”, असेही ‘त्या’ महिलेने म्हटले आहे.

नेमका काय प्रकार घडला ?

सांताक्रूझ येथील गोळीबार परिसरात रविवारी (४ ऑगस्ट) सकाळी विजेच्या झटक्याने ५५ वर्षीय माला नागम आणि त्यांचा २६ वर्षीय मुलगा संकेत या दोघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर येथील स्थानिक रहिवाशांमध्ये अत्यंत नाराजीचे वातावरण होते. “जोरदार पावसामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी पोचल्यानंतर सुरक्षितता म्हणून येथील वीजप्रवाह खंडित का केला नाही ?”, असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून विचारण्यात येत होता. याच पार्श्वभूमीवर, सोमवारी (५ ऑगस्ट) दुपारी विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांताक्रूझमधील या विभागाला भेट दिली.

विश्वनाथ महाडेश्वर तेथे गेलेले त्यावेळी येथील संतप्त स्थानिकांनी आणि विशेषतः महिलांनी महापौरांभोवती गराडा घातला आणि प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. संतप्त नागरिकांच्या कोणत्याही प्रश्नाला समाधानकारक उत्तर न देता उलट महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर महापौर महाडेश्वर यांनी या संतप्त नागरिकांपैकी एका महिलेचा चक्क हात मुरगळत “मी कोण आहे ते तुला माहित नाही ?” असे म्हणत धमकी दिल्याचे खरंतर ‘त्या’ व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. मात्र, आता ती संबंधित महिला असा कोणताही प्रकार घडलाच नसल्याचे म्हणत आहे. त्यामुळे ही महिला स्वतःहून, स्वःताच्या इच्छेने हे स्पष्ट करत आहे कि त्यांच्यावर असे स्पष्ट करण्याचा दबाव आणला गेला आहे ? असा गंभरी प्रश्न येथे उपस्थित होतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धूम स्टाईलने गंठण चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

News Desk

मराठा समाजाचं नुकसान होऊ नये हीच माझी प्रामाणिक भावना – अशोक चव्हाण 

News Desk

मंदिरात जाऊन दर्शन घेणे प्रत्येकाच्या श्रध्देचा भाग यावरून राजकारण करू नये !

News Desk