HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्र्यांचा हा पुणे दौरा म्हणजे फक्त दिखावा !

मुंबई | “मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. पुण्यातील कोरोनास्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेल्यानंतरचा हा मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा म्हणजे एक दिखावा आहे”, अशी बोचरी टीका पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर “पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता असल्याने राज्य सरकारकडून हा भेदभाव केला जात आहे”, असा आरोपही जगदीश मुळीक यांनी केला आहे. राज्यात मुंबई, पुण्यासह अन्य काही शहरे ही सुरुवातीपासूनच कोरोनाची हॉटस्पॉट राहिलेली आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुरुवारी (३० जुलै) पहिल्यांदाच पुण्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या पुणे दौऱ्यावर मात्र भाजपकडून टीका होत आहे.

मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले !

“पुण्यातील कोरोनास्थिती अत्यंत गंभीर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल ५० हजारांहूनही अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र, तरीही पुण्यात बेड्सची उपलब्धता नाही. मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. पालकमंत्री अजित पवार बैठका घेत आहेत. मात्र, राज्य सरकारने पुण्यातील कोरोना परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नाही. सरकार त्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरले आहे”, असा आरोप जगदीश मुळीक यांनी केला. “महापालिकेने आतापर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल २०० कोटी खर्च केले. तर राज्य सरकारने फक्त ३ कोटींचीच मदत केली. आता तरी मुख्यमंत्र्यांनी बैठकीचे नाटक न करता पुण्याला ५०० कोटींची मदत जाहीर करावी”, अशी मागणीही मुळीक यांनी केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे कोरोनाच्या या संपूर्ण काळात सुरुवातीपासून पुण्यातील स्थितीकडे पूर्ण लक्ष ठेवून आहेत. पुण्यातील कोरोनास्थिती आटोक्यात आणण्यासाठी अजित पवारांनी प्रशासनाला बैठक घेऊन वारंवार सूचना दिलेल्या आहेत. मात्र, आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच पुण्याचा दौरा करणार असून पुण्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेणार आहेत. मात्र, यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका देखील होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील कोरोनास्थितीकडे लक्ष द्यावे”, असा सल्ला देखील दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हे तर ‘भ्रमित ठाकरे’ सरकार, चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

News Desk

रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन आता राज्य सरकार खरेदी करणार

News Desk

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

News Desk